'या' कारणामुळे आमदार के.सी पाडवींवर भडकले राज्यपाल


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - ठाकरे मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. अनेक नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काँग्रेसचेआमदार के. सी. पाडवी यांच्यावर भडकले. के सी पाडवी शपथ घेतल्यानंतर मनोगत व्यक्त करत असताना राज्यपालांनी त्यांना अडवले आणि त्यांना पुन्हा शपथ घेण्यास सांगितली. या प्रकारानंतर इतर नेत्यांनी नियमाने शपथ घेतली.

याअगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी अशाचप्रकारे शपथ घेतली होती. त्यावेळी देखील राज्यपालांनी नाराजी वर्तवली होती. आमदारांनी नियम आणि कार्यपद्धतीचे उल्लंघन करत राज्यपालांकडून शपथ सुरु करण्यापूर्वी आपआपले नेते आणि देवांचे नाव घेतले होते. पुढील कोणत्याही कार्यक्रमात तसे न करण्याच्या सूचना देखील राज्यपालांनी दिल्या होत्या. मात्र आज (सोमवार) के सी पाडवींकडून तसा प्रकार घडला.

महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये तिन्ही पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांना समाविष्ट केले जात आहे. धर्मनिरपक्षेतेच्या तत्तावर स्थापित झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या या मंत्रिमंडळात सर्वच समुदायाच्या नेत्यांना जागा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरीही काही नेत्यांमध्ये आपल्याला मंत्रिमंडळात स्थान नाही मिळाल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. तर काहींनी चक्क राजीनामा देण्याची तयारी सुद्धा दर्शवली आहे. नवीन मंत्रिमंडळात अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post