सोन्याच्या दुकानावर चोरट्यांची धाड; 65 हजारांचे दागिने लंपास
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पाईपलाईनरोडवर असलेले सोन्या-चांदीचे दुकान फोडून चोरट्याने 65 हजार 250 रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे लंपास केले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, किशोर दत्तात्रय नांदुरकर (वय- 57 रा. दळवी मळा, पाईपलाईनरोड) यांचे पाईपलाईनरोडवर सागर हॉटेलसमोर सोन्या-चांदीचे दुकान आहे. शनिवारी (दि. 30) रात्री नऊ ते रविवारी (दि. 01) सकाळी सातच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद दुकानाचे कुलूप तोडून दुकानात ठेवलेले 65 हजार 250 रूपये किंमतेचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले. नांदुरकर यांच्या रविवारी सकाळी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहे.
Post a Comment