माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : वरळीमधून पहिल्यांदाच आमदार झालेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनर कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असणा-या आदित्य यांच्या रूपाने घराणेशाहीचाच राजकारणात दबदबा असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे. अशाप्रकारे नेतेपदी वर्णी लागलेले आदित्य हे एकमेव नेते नसून अन्य सहाजण हे राजकीय कुटुंबातील वारस असल्याचे दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत हे सहाजण जे राजकारणातील घराणेशाहीचा वारसा पुढे नेणार आहेत.
अमित देशमुख यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र असणारे अमित देशमुख यांनी लातूर शहर मतदारसंघामधून निवडणूक जिंकली.
धारावी मतदारसंघातून सलग तिस-यांदा विजयी झालेल्या वर्षा गायकवाड यांनी सोमवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या आहेत. राजकीय वारसा असणारे काँग्रेसमधील आणखी मंत्री म्हणजे विश्वजीत कदम. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे पुत्र असलेले विश्वजीत हे सांगलीतील पलूस-कडेगाव मतदारसंघातून निवडून आले आहेत.
काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीच्याही दोन आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीचेच राहुरी मतदारसंघातील आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे हे पंचवीस वर्षे आमदार व एकदा खासदार राहिलेले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे प्राजक्त यांचे मामा आहेत. नेवासा मतदारसंघातील नवनिर्वाचित अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. निवडून आल्यानंतर गडाख यांनी शिवसेनेला पाठींबा दिला होता. शंकरराव हे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पुत्र आहेत.

Post a Comment