उड्डाणपुलाच्या जागेसाठी संरक्षण मंत्र्यासमवेत बुधवारी बैठक - खा.डाॅ.विखे
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या समवेत बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहीती खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशना दरम्यान खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातील उड्डाणपूलाच्या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. काही दिवसांपुर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून नगर शहराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाकडे लक्ष वेधले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रमुख आशिष शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या समवेत बैठक घेवून संरक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्याचे निश्चित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर
खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची भेट घेवून उड्डाण पुलासाठी आवश्यक असलेल्या जागेचे भूसंपादन होणे आवशायक आहे. मात्र सदर जागा संरक्षण विभागाच्या ताब्यात असल्याने रखडलेल्या उड्डाण पुलाच्या कामाबाबत त्यांनी संरक्षण मंत्र्यांना सविस्तर माहीती देवून निवेदन दिले.
यासंदर्भात केद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून बुधवारीच रक्षा भवन मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व संरक्षण विभागाच्या अधिकार्या समवेत बैठक आयोजित करून या प्रश्नाबाबत निर्णय करण्याचे आश्वासन दिले असल्याचे खा.डाॅ.सुजय विखे यांनी सांगितले.
या बैठकीत खा.डाॅ विखे यांनी संरक्षण विभागाच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या भागातील नागरी प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी संसद सदस्यांना जादा अधिकार देण्याची मागणी केली असून याबाबतचे निवेदनही दिले असल्याचे स्पष्ट केले.
Post a Comment