विक्की वेलिंगकरचे 'डा रा डिंग डिंग ना' गाणे रिलीज
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - विक्की वेलिंगकर सिनेमाचे ‘डा रा डिंग डिंग ना’ हे दुसरे गाणे सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. विक्की वेलिंगकर या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका असून हा चित्रपट ६ डिसेंबरला रिलीज होणार आहे.
विक्की वेलिंगकर’ चित्रपटाच्या या नवीन गाण्याचे "साज अशी कि मन जुळता थांबे ना, वाऱ्यावरी, पाय खाली पण पडे ना ,डोन्ट स्टॉप टू ट्याप युअर फीट ऑन द फ्लोर, मन बोले नाचू मोर मोर मोर, उद्यावरी आहे तुझा माझा कसला जोर, डा रा डिंग डिंग ना" हे बोल असून ‘डा रा डिंग डिंग ना’ हे गाणे पीयूष अंभोरे याने गायले आणि लिहिले असून मनन मुंजाळ याने संगीतबद्ध केले आहे.
या गाण्यामध्ये सोनाली कुलकर्णी म्हणजेच विक्की कोणाचा तरी शोध घेताना दिसत असून या गाण्यात मास्क मॅन देखील दिसत आहे ,त्याशिवाय या गाण्याचा संपूर्ण मूड पूर्णपणे क्लब प्रकारचा असून हे गाणे तरुणाईला ठेका धरायला लावेल आणि तरुण मुलामुलींना हे गाणे नक्की आवडेल आणि हे ' डा रा डिंग डिंग ना ' गाणे ऐकल्यानंतर प्रेक्षकांमध्ये ‘विक्की वेलिंगकर’ या सिनेमाची उत्कंठा अधिकच वाढेल यात काही शंका नाही.
मनन मुंजाळ आणि पीयूष अंभोरे म्हणाले, हे गाणे तयार करताना खूप मज्जा आली या गाण्याचा आमच्यासाठी अविस्मरणीय असा अनुभव होता या गाण्याचा मूड क्लब प्रकारचा असून हे गाणे तरुणाई ला नक्की आवडेल असे आम्हाला वाटते या सिनेमासाठी काम करण्याची संधी सौरभ वर्मा आणि जिसिम्सने आम्हाला दिली याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो "
सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जीसिम्सचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार तसेच प्रणय चोकसी, डान्सिंग शिवा प्रॉडक्शनचे अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा आणि लोकीज स्टुडिओचे सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे.
Post a Comment