नगर तालुक्यात बत्ती गुल


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या महापारेषण यांच्या 132 के.व्ही सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिचोंडी पाटील,मेहकरी,नारायणडोहो,दौलावडगाव या चार सबस्टेशनची वीज वीस तासापासून जास्त वेळ बंद आहे या चार सबस्टेशन अंतर्गत जवळपास 35 ते 40 गावे येतात.

महापारेषण कंपनीने पिंपळगाव लांडगा ग्रामपंचायतीचा कर गेले अनेक महीन्यापासुन न भरल्याच्या कारणास्तव ग्रामपंचायतीने महापारेषणच्या 132 के.व्ही सबस्टेशनला सिल ठोकल्याचे समजते परंतु पिंपळगाव लांडगा ग्रामपंचायत व महापारेषण या दोन्हीच्या वादामध्ये बाकीच्या गावांचा काही एक संबंध नसताना सुद्धा त्यांना त्रास सहन करावा लागत आहे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ जर नागरिकांकडे विज बिले थकले तर ताबडतोब येऊन त्यांचे विज कनेक्शन कट करतात आणि वीज बिल भरल्यानंतरच कनेक्शन जोडले जाते त्या वेळेस दुष्काळी परिस्थिती सुद्धा पाहिली जात नाही मग आता महावितरण व महापारेषण यांच्या बोंगळ कारभाराचा फटका जनतेला कश्यासाठी महापारेषणच्या या गलथान कारभाराविरोधात नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


जनतेला वीज पुरवण्याची जबाबदारी महावितरणची असून त्यांनी तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलनात्मक भूमिका स्वीकारावी लागेल.
अशोक कोकाटे(कार्याध्यक्ष नगर तालुका राष्ट्रवादी)

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post