माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : नववर्षांच्या पार्श्वभूमीवर मद्याची वाढती मागणी लक्षात घेऊन विनापरवाना मद्य सेवन करणा-यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अर्धाक्षक, पराग नवलकर यांनी केली आहे.
परराज्यातुन अवैधरित्या मद्य जिल्हयातील सर्व कार्यालया मार्फत वेकायदेशीर मद्य, बनावट मद्य तसेच विनापरवाना मळीच्या हातभटटीसाठी होणा-या वापराबाबत गुन्हें नोंद करण्याचे काम अविरतपणे चालू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील निरीक्षक अ विभाग, निरीक्षक व विभाग, निरीक्षक कोपरगाव, निरीक्षक संगमनेर,निरीक्षक श्रीरामपुर, निरीक्षक भ.प.१,निरीक्षक भ.प.२ या कार्यालयाकडून नाताळ व नववर्षाच्या गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांना परवाना घेऊनच मद्य सेवन करावे. हे परवाने एक वर्षासाठी किंवा एक दिवसासाठी सुध्दा उपलब्ध आहेत. हे परवाने ऑनलाईन मिळण्याची सोय करण्यात आली आहे. विनापरवाना मद्य सेवन करताना अथवा जवळ बाळगल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल. बीअर बार किंवा परमिट रुमचा परवाना नसलेल्या हॉटेल चालकांनी मद्य पिण्यासाठी व्यवस्था कल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. असेही अधीक्षक पराग नवलकर यांनी प्रसिध्दपत्रकात म्हटले केले आहे.
नागरिकांची फसवणुक हाण्याची शक्यता....
उच्च प्रतिच्या मद्याच्या बाटलीमध्ये हलक्या प्रतीचे व भेसळयुक्त मद्य भरुन ते कमी दरात विक्रीकरिता ठेवण्याची शक्यता आहे. असे प्रकार करुन नागरिकांची फसवणुक
होण्याची शक्यता आहे. बनावट व भेसळयुक्त मद्य विक्रीतुन ग्राहकांची फसवणुक तर होतेच शिवाय त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. बनावट व भेसळयुक्त मद्याच्या प्रलोभनास बळी न पडता अशा प्रकारची माहिती मिळाल्यास तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही अधीक्षक पराग नवलकर तसेच निरीक्षक एस.एम.सराफ व निरीक्षक ए.बी.बनकर यांनी केले आहे.
Post a Comment