माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत होऊ घातलेल्या महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भारतीय जनता पक्षानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार भाजपने आ. राधाकृष्ण विखे पा. आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना दिले आहेत. संख्याबळ दाखवून देण्याची तयारी भाजपने केली असल्याने अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची 31 डिसेंबरला निवडणूक होत आहे.
राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदेत राबविण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचवेळी भाजपनेही या निवडणुकीत आपली ताकद दाखवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची सर्व जबाबदारी आ. विखे आणि प्रा. शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार कोण? याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. तथापी विद्यमान अध्यक्षा शालिनीताई विखे यांना उमेदवारी देण्यात येणार की भाजपच्या अन्य उमेदवारास निवडणूकीत उतरवले जाणार याबाबत नेत्यांच्या पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. उमेदवाराचे नाव आधी जाहीर करण्याऐवजी उमेदवारी अर्ज भरतेवेळीच नाव उघड करण्याची भूमिका महाविकास आघाडी आणि भाजपनेही घेतली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाचे दोन्ही बाजुने अनेक दावेदारांची नावे समोर येत असली तरी प्रत्यक्षात उमेदवार कोण हे मंगळवारी (दि.31) सकाळीच स्पष्ट होणार आहे.
भाजपच्या कोअर कमिटीची रात्री होणार बैठक
भाजप नेतृत्वाने जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी संदर्भात आ. विखे आणि प्रा. शिंदे यांनाच सर्वाधिकार दिलेले आहेत. त्यांच्यात याबाबत चर्चा झालेली आहे. सोमवारी (दि.30) रात्री यासंदर्भात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून त्यात आतापर्यंतच्या चर्चेचा तपशील समजू शकेल. कोअर कमिटीच्या बैठकीत संख्याबळ, उमेदवार याबाबत सविस्तर चर्चा केली जाणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी दिली आहे.
दरम्यान शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचीही सोमवारी सायंकाळी बैठक होणार असून या बैठकीत अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच विषय समित्यांच्या पद वाटपाबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment