झेडपीच्या अध्यक्षपदी राजश्री घुले ; उपाध्यक्षपदी प्रताप पाटील शेळके यांची बिनविरोध निवड


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – राज्यापाठोपाठ अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे प्रताप पाटील शेळके यांची बिनविरोध निवड झाली. भाजपाने माघार घेतल्याने निवडी बिनविरोध झाल्या.


महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले, उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे प्रताप शेळके यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय झाला. हॉटेल राज पॅलेस येथे महाविकास आघाडीच्या बैठकीला नेत्यांसह जिल्हा परिषद सदस्य हजर होते.


राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक अंकुश काकडे, काँग्रेसचे प्रकाश मुगदीया, शिवसेना निरीक्षक भाऊ कोरेगावकर, आ.रोहित पवार, आ. आशुतोष काळे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, शशिकांत गाडे, क्रांतिकारी पक्षाचे सुनील गडाख, बाळासाहेब सांळुके, प्रताप ढाकणे आदी उपस्थित आहे.

यावेळी नेत्यांनी राजश्री घुले व प्रताप शेळके यांचे नाव जाहीर केल्यानंतर त्यांचा सत्कार केला. भाजपाने अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी भरलेले अर्ज माघारी घेतल्याने निवडी बिनविरोध झाल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post