तुळजाभवानी मंदिरातील 33 पुजाऱ्यांवर कारवाई; 30 दिवसांपर्यंत मंदिरात बंदी
माय अहमदनगर वेब टीम
तुळजापूर - श्री तुळजाभवानी मंदिरात गैरवर्तन करणाऱ्या तब्बल ३३ पुजाऱ्यांविरोधात तुळजाभवानी मंदिर संस्थान देऊळ कवायत नुसार मंदिरबंदीची कारवाई केल्याने पुजाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये ३२ पुजाऱ्यांना १५ दिवस, तर एकाला तब्बल महिनाभरासाठी मंदिरात बंदी करण्यात आली आहे.
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा कारभार निजामकालीन देऊळ कवायत नुसार चालतो. १९०९ साली अमलात आलेल्या देऊळ कवायतच्या कलम २४ व कलम २५ अन्वये मंदिर संस्थानने एकाचवेळी तब्बल ३३ पुजाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे बुधवारी (दि. २७) आदेश बजावले आहेत. त्यानुसार शुक्रवारी (दि. २९) सदरील पुजाऱ्यांवर मंदिरबंदीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मंदिरात गैरवर्तन, गोंधळ घालणे, न्हानी गेट ऐवजी पितळी दरवाजा मार्गे प्रवेश करणे, सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालणे, भाविकांशी गैरवर्तन आदी तक्रारींवरून या पुजाऱ्यांविरोधात मंदिर संस्थानने मंदिरबंदीची कारवाई केली आहे.
या पुजाऱ्यांंवर करण्यात आली कारवाई
या कारवाईमध्ये ३२ पुजाऱ्यांवर दि. २९ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर असे पंधरा दिवस मंदिर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये बालाजी प्रकाश सोंजी, प्रवीण प्रताप पाटील, कशीश राजेंद्र कदम सोंजी, सागर भारत कदम, श्याम अर्जुन इंगळे, नागनाथ आबासाहेब भिसे, सचिन बुबासाहेब कदम-पाटील, प्रशांत विलासराव कदम- सोंजी, धीरज सुरेश कदम-भैये, शशिकांत बाबूराव कदम-पाटील, सुहास सुरेश कदम-भैये, बालाजी तानाजी कदम-परमेश्वर, मोहन वसंतराव कदम पाटील, पृथ्वीराज प्रफुल्ल कदम-मलबा, अभय अरुण पाटील, प्रद्युम्न नानासाहेब कदम भैये, निखिल नेताजी पाटील, तुषार अनंत कदम, दिलीप शिवाजीराव पाटील , विशाल सुनील कदम सोंजी, राजकुमार युवराज कदम पाटील, विकास सुनील कदम -सोंजी,अतुल रमेश कदम मलबा, रूपेश विलासराव कदम परमेश्वर, अनंत वीर, प्रमोद जनार्दन पवार, मंगेश साळुंखे, विलासराव यशवंत सोंजी, ओंकार लक्ष्मीकांत भिसे, अभिजित माधवराव कुतवळ, मुकुंद (बाबर) संभाजी कदम यांचा समावेश आहे. तर, विवेक (कालिदास) अशोकराव पाटील यांच्यावर ३० दिवस मंदिरबंदीची कारवाई केली आहे.
Post a Comment