ब्रह्माकुमारीज ने “जागतिक एड्स निर्मुलन दिन” केला विश्वविक्रम करून साजरा


माय अहमदनगर वेब टीम
सातारा - ०१ डिसेंबर रोजी १४३ देशात महिलांद्वारे संचालित केल्या जाणाऱ्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या नागठाणे सेवाकेंद्राच्या संचालिका डॉ. बी के सुवर्णा व डॉ. बी के दीपक हारके यांनी “जागतिक एड्स निर्मुलन दिन” विश्वविक्रम करून साजरा केला.

जिजाऊ शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय करंजे पेठ, सातारा च्या ४३० मुलींनी मुख्याध्यापिका सौ.नंदिनी अरूण यादव यांच्या मार्गदर्शनाखाली “AIDS DAY” च्या आकारात बसून विश्वविक्रम केला. याची नोंद “इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्डस्” मध्ये झाली आहे.

या विश्वविक्रमानंतर डॉ बी के सुवर्णा यांचे १०३ विश्वविक्रम झाले आहेत व डॉ. बी के दीपक हारके यांचे १७० विश्वविक्रम झाले आहेत.

या कार्यक्रमा च्या यशस्वितेसाठी बी के शिवानी, बी के मोनिका, बी के पप्पूभाई, बी के देवदासभाई यांच्यासह शाळेच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post