महानायकाचा महासन्मान




माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज (रविवार) दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. चित्रपट क्षेत्रात अनेक दशके दिलेल्या महान योगदानासाठी अमिताभ यांना हा पुरस्कार देण्यात आला. 1970 च्या दशकापासून मोठ्या पडद्यावर अमिताभ यांनी ठसा उमटावला आहे. या कार्यक्रमास संपूर्ण बच्चन कुटुंबीय उपस्थित होते. दरम्यान 23 डिसेंबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडलेल्या वितरण सोहळ्याला प्रकृतीच्या कारणामुळे अमिताभ बच्चन अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांना आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अजुन बरेच काम करायचे आहे - अमिताभ
अमिताभ बच्चन यांनी या पुरस्काराबद्दल भारत सरकार, सुचना व प्रसारण मंत्रालय आभार मानेल. यावेळी आभार प्रगट करताना ते म्हणाले की, 50 वर्षांपूर्वी या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे तेव्हापासूनच मी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. या पुरस्कारच्या घोषणेवेळी माझ्या मनात आले की, तुम्ही मला आराम करण्यास सांगत आहात. मात्र अद्याप बरेच काम करायचे बाकी आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post