...या तर चोराच्या उलट्या बोंबा
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - आपल्यासह सोबत आलेल्या अपक्ष आमदारांना आश्वासन देऊन ठेवली. प्रत्यक्षात सरकार स्थापन होऊन आठ दिवस होत आले तरी साधे खातेवाटही करू शकले नाही. दिलेली आश्वासने पुर्ण करु शकत नाही. त्यामुळे तिघाडीच्या आमदारांमध्येअस्वस्थता आहे. ती लपविण्यासाठी आता भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारल्या जात आहेत. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशा शब्दांत राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी तिघाडीचा जोरदार समाचार घेतला आहे.
भाजपातील डझनभर आमदार फुटणार असे धादांत खोटे आणि वास्तवाशी कुठलाही संबंध नसलेले वृत्त आज सुत्रांच्या हवाल्याने काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही निव्वळ अफवा आहे. तिघाडीच्या नेत्यांकडून अशा अफवा पसरवण्यात येत आहेत. चोराच्या उलट्या बोंबा मारणे सुरु आहे. भाजप मध्ये अन्य पक्षातून आलेले असो वा मुळ भाजपचे असलेले आमदार सर्व पक्ष शिस्त पाळणारे आहेत. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाईं शाह,आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर पुर्ण विश्वास आहे. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केले त्यामुळेच आश्वासक, प्रभावी, पारदर्शी नेतृत्वावर विश्वास ठेऊन अन्य पक्षातून अनेक आमदार भाजपात आले. सत्ता स्थापनेच्या काळात भाजपला या सर्व आमदारांवर विश्वास असल्यानेच त्यांना तिघाडीच्या आमदारांप्रमाणे डांबून ठेवावे लागले नाही. कुणीही कुठल्याही प्रकारे पक्ष शिस्त मोडली नाही. तिन्ही पक्षांनी आमदारांना डांबून ठेवले. मोठमोठी आश्वासनं दिली. प्रत्यक्ष आता काहीच घडत नाही. त्यामुळे त्यांच्याच आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. सध्या तिघाडीचे जे सुरु आहे ते पाहून भाजपमधे अन्य पक्षातून आलेले आमदार म्हणत आहेत की, बरे झाले आम्ही भाजप मधे आलो. आम्ही 105 आमदार संपूर्ण पणे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी असून अनेक लोककल्याणकारी प्रकल्प बंद करून विनाशाचे काम करणाऱ्या या सरकारला लोकांच्या प्रश्नांवर आम्ही सळोकी पळो करुन सोडू, सत्तेची विनाशकारी तिघाडी केलेल्या या पक्षांनी जरा आपल्या पक्षातील आमदारांच्या मनात नेमके काय चाललंय? त्याचा एकदा कानोसा घ्यावा, असा सल्ला ही आमदार अँड आशिष शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.
Post a Comment