मुंबईत भाजपचा महापौर असेल ; चंद्रकांत पाटलांचा दावा



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -  'आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर मुंबईत भाजपचा महापौर असेल', असा दावा रविवारी या पक्षाकडून करण्यात आला. त्यामुळे पुढील पालिका निवडणुकीत शिवसेनेला भाजपकडून कडवे आव्हान मिळेल हे स्पष्ट झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत रविवारी पत्रकारांशी बोलताना हा दावा केला. मुंबईतील भाजपची संघटनात्मक बैठक संपल्यानंतर बोलताना स्पष्ट केले.

'राज्यातील पक्षसंघटना आणखी मजबूत करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या आम्ही मुंबईवर लक्ष केंद्रीत केले आहे. सन २०२२ची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणे हे भाजपचे एकमात्र उद्दिष्ट आहे. त्यामुळे मुंबईच्या बाबतीत लहानसहान गोष्टींचा विचार आम्ही करीत आहोत. येत्या १५ डिसेंबरपर्यंत वॉर्ड अध्यक्ष, २० डिसेंबरपर्यंत विधानसभा क्षेत्र, २५ डिसेंबरपर्यंत जिल्हाध्यक्ष आणि ३० डिसेंबरपर्यंत मुंबई भाजपच्या अध्यक्षांची निवड होईल', अशी माहिती पाटील यांनी दिली. 'मुंबईचा नवा अध्यक्ष घोषित करताना केंद्रातील एखादा नेता उपस्थित असणार आहे', असे ते म्हणाले. या बैठकीला विनोद तावडे, आशीष शेलार आणि राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post