संसदेच्या कँटिनमधील सब्सिडी रद्द
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली- संसदेच्या कँटीनमधील अन्नावर नेत्यांना मिळणाऱ्या सब्सिडीवर सोशल मीडियावर चर्चा होत असते. लोक नेहमी प्रश्न विचारतात की, संसदेत नेत्यांना इतके स्वस्त जेवण का मिळते? त्यानंतर आता खासदारांना कँटिनमध्ये मिळणारे स्वस्त खाद्यपदार्थ बंद होणार आहेत. अन्नावरील सब्सिडी रद्द करण्याचा एक प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात मांडला. या प्रस्तावाला सर्वपक्षीय खासदारांनी मान्यता दिली असून, सब्सिडीमुळे दरवर्षी खर्च होणारे 17 कोटी रुपये वाचणार आहेत.
नेत्यांना संसदेच्या कँटिनमध्ये मिळणाऱ्या या स्वस्त खाद्यापदार्थांवरुन अनेकदा विरोध झाला आहे. या कँटिनच्या स्वस्त दरांच्या फलकाचे फोटो अनेकदा सोशल मीडियातून व्हायरल होत असतात. यावर सर्वसामान्य जनतेकडूनही अनेकदा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी देखील संसदेच्या खाद्य समितीला या विषयात लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. मागच्या वेळेस कँटीनमधील अन्नाच्या किमती वाढवून सब्सिडी कमी केली होती, पण आता ही ही पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Post a Comment