उंडे, झावरे व कुसमुडे या विद्यार्थ्यांची इस्त्रो सहलीसाठी झाली होती निवड
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अ.ए.सो.च्या भाऊसाहेब फिरोदिया शाळेचे विद्यार्थी विनीत विक्रम उंडे, प्रणव गोकुळ झावरे व रोहन बाळासाहेब कुसमुडे यांनी श्रीहरीकोटा येथे कार्टोसॅट 3 या उपग्रहाचे प्रेक्षपणाचा थरार अनुभवला. तर या विद्यार्थ्यांनी इस्त्रो केंद्राची पहाणी करुन शास्त्रज्ञांशी संवाद साधला.
सी.व्ही. रमन बालवैज्ञानिक परीक्षेत सदर विद्यार्थ्यांनी यश मिळवल्याने त्यांची श्रीहरीकोटा येथे होणार्या इस्त्रोच्या सहलीसाठी निवड झाली होती. विनीत उंडे व प्रणव झावरे हे इयत्ता 9 वी चे तर रोहन कुसमुडे हा इयत्ता 8 वीचा विद्यार्थी आहे. त्यांचे ग्रुप लिडर असलेले शिक्षक बाळासाहेब डोंगरे व अरुण तुपविहीरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल यशस्वी पार पडली.
कार्टोसेट 3 हा तिसर्या पिढीतील वेगवान व प्रगत उपग्रह आहे. छायाचित्र टिपण्याचे त्याचे तंत्रज्ञान अत्यंत उच्च दर्जाचे आहे. या उपग्रहामुळे भारताच्या सीमेवर अंतराळातून लक्ष ठेवणे शक्य होणार असून, याचा उपयोग लष्करासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याची माहिती इस्त्रोच्या संशोधकांकडून देण्यात आल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. परीक्षा उत्तीर्ण होऊन इस्त्रोची सहल यशस्वी करणार्या शालेय विद्यार्थ्यांचे संस्थेच्या प्रमुख कार्यावाह छायाताई फिरोदिया, सह कार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी,नियामक मंडळाच्या सदस्या सुनंदाताई भालेराव, गौरव मिरीकर, मुख्याध्यापक उल्हास दुगड, पर्यवेक्षक संतोष कुलकर्णी, संजय पडोळे, रवींद्र लोंढे यांनी अभिनंदन केले.
Post a Comment