नेहा कक्करच्या नाराजीनंतर कॉमेडियन गौरव गेराचा माफीनामा
माय अहमदनगर वेब टीम
टीव्ही डेस्कः विनोदी अभिनेता गौरव गेराने अलीकडेच एका व्हिडिओवरुन गायिका नेहा कक्करची माफी मागितली आहे.एका विनोदी कार्यक्रमात कीकू शारदा आणि गौरव गेरा यांनी नेहाची खिल्ली उडवली होती. नेहाची उंची आणि गाणे गाताना तिचे होणारे हावभाव यावरुन दोघांनी नेहावर विनोदी टोलेबाजी केली. दो पैग मार या नेहाच्या गाण्याचा वापरदेखील या व्हिडिओत करण्यात आला होता. यावरुन नेहाने नाराजी व्यक्त करत इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली होती. आता एका मुलाखतीत गौरवने नेहाची माफी मागत, तिला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, कारण मी तिचा मोठा चाहता आहे.
गौरवचे स्पष्टीकरण
''मी तिला कधीही दुःखी करणार नाही, कारण मी तिचा चाहता आहे. मला तिची गाण्याची शैली पसंत आहे आणि विशेषतः तिची गाणी पार्टीचा प्राण असतात. मी तिला वैयक्तिक ओळखत नाही, पण जेव्हा कधी भेट होते, तेव्हा आम्ही एकमेकांचे अभिवादन स्वीकारत अशतो. तिचे टॅलेंट नक्कीच प्रशंसीय आहे. ते मी सिद्ध करणारा कुणी नाही. इन्स्टाग्रामवर तिचे 30 मिनियन फॉलोअर्स आहेत. चाहते तिच्यावर किती प्रेम करतात, हा याचा पुरावा आहे.''
वाहिनीने काढून टाकला व्हिडिओ...
गौरव पुढे म्हणाला, "नेहाने आमच्यावर थेट आरोप केलेला नाही. तिने वाहिनीवरही नाराजी व्यक्त केली आहे. आता वाहिनीने तो व्हिडिओ काढून टाकला आहे. कीकू आणि मी आम्ही दोघेही तिचे चाहते आहोत. आम्हाला तिच्यावर गर्व आहे. तिला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. ती खूप चांगली असून रॉकस्टार आहे. मला तिच्या उंचीविषयी ठाऊक नाही. माझीही उंची एव्हरेज आहे. कीकूचीही उंची कमी आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये आम्ही एकमेकांची खिल्ली उडवत असतो. नेहा एवढी दुखावली जाईल, असे मला वाटले नव्हते."
नेमके काय झाले?
नेहाने इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत एक मोठी पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले, “मी अशा नकारात्मक वातावरणात जगू शकत नाही. परंतु माझ्यासोबत घडलेला तो प्रकार आता मी विसरले आहे. त्या कार्यक्रमात माझ्यावर केले गेलेले विनोद पाहून त्यावेळी मला खुप राग आला होता. परंतु आता मी ती घटना विसरण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या चाहत्यांना विनंती आहे की तुम्ही देखील हे विसरुन जा. कारण देव सगळं बघत आहे. देवच त्यांना शिक्षा करेल. माझ्या नावाचा वापर करणे बंद करा. जर तुम्हाला माझ्या गाण्यांचा तिरस्कार करत असाल, तर माझ्या गाण्यांवर एन्जॉय करणे, डान्स किंवा अभिनय करणे बंद करा.” अशा शब्दात नेहाने आपली नाराजी व्यक्त केली.
नेहा पुढे म्हणते, "माझी गाण्यांवर पार्टी करता. आपल्या बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडला माझी गाणी ऐकवता. त्यानंतर एवढ्या वाईट शब्दांत माझ्याविषयी लिहिता. लाज वाटत नाही का तुम्हाला? आपण कलाकारांचे आभार व्यक्त करायला हवे, त्यांच्यामुळे आनंदी होता. मग असे का करता? त्रास झाला मला. पण दुसरीकडे मी आपल्या #Nehearts (फॅन्स) आणि समर्थकांची आभारी आहे."
नेहा या नोटच्या कॅप्शनमध्ये लिहिले, मी भाग्यभाली आहे की, माझ्याजवळ एवढ्या मोठ्या संख्येने तुमच्यासारखे लोक आहेत. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यावर प्रेम करेल, तुमचा सन्मान करेले. #Nehearts आणि #NehuHappyNeHeartsHappy एवढा सुंदर हॅशटॅग बनवण्यासाठी धन्यवाद."
नेहाचा भाऊ टोनीने व्हिडिओ शेअर करुन लिहिली भावनिक पोस्ट...
नेहाचा भाऊ आणि गायक टोनी कक्कर याने देखील कीकू व गौरव विरोधात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. “माझ्या बहिणीची तिच्या उंचीवरुन उडवलेली खिल्ली मला बिलकूल आवडली नाही. ती अफाट मेहनत, जिद्द आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचली आहे. कुठल्याही व्यक्तीची त्याच्या शरीरावरुन अशी खिल्ली उडवणे योग्य नाही.” अशा शब्दात त्याने आपली नाराजी व्यक्त केली.
Post a Comment