५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी आता हवा १५ टक्के वृद्धी दर : तज्ञ



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -रिझर्व्ह बँकेने या वेळी अपेक्षाभंग करत रेपो दरात कोणताही बदल केला नाही. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज घटवून ५% केला आहे. मागील अंदाज ६.१% चा होता. तज्ञांच्या अंदाजानुसार, सरकारने उचललेल्या पावलांमुळे आगामी तिमाहीत वृद्धी दर वाढेल. असे असले तरी २०२४ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवरूनही प्रश्न उपस्थित केला जातो. तज्ञांनुसार, २०२४-२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठी १५ टक्क्यांपर्यंत नाममात्र वाढ आवश्यक आहे. मात्र, आर्थिक विकास दर अावश्यक वृद्धी दरापेक्षा अर्धा ६.१ टक्क्यांवर आहे. या कारणास्तव वेळेत उद्दिष्ट प्राप्त करणे खूप कठीण असेल. दुसऱ्या तिमाहीत साधारण सर्व संकेत घसरणीत आहेत. केअर रेटिंग्जचे मुख्य अर्थतज्ञ मदन सबनिवास यांच्या म्हणण्यानुसार, सद्य:स्थितीत ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत कमीत कमी ७ वर्षांचा अवधी लागेल. हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जीडीपी वृद्धी दर १५ %असायला हवा. आगामी काळात याचा परिणाम रोजगारावर दिसेल. जीडीपीमध्ये घट आल्यावर नोकर कपात होऊ शकते. बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ञ समीर नारंग म्हणाले, ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी वाट पाहावी लागेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post