५० हजारांपर्यंतचं गिफ्ट GST मुक्त !



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - जीएसटी देशभरात लागू झाल्यानंतर त्यातले खाचखळगे हळूहळू बाहेर येऊ लागले असून ५० हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीचं गिफ्ट दिल्यास त्यावर जीएसटी द्यावा लागेल असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज केलेल्या एका ट्विटमध्ये नमूद केले आहे.
कंपन्यांकडून दरवर्षी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गिफ्टच्या अनुशंगाने हे ट्विट करण्यात आले आहे. वर्षभरात दिल्या जाणाऱ्या गिफ्ट्सची किंमत ५० हजारांच्या आत असल्यास त्यावर कोणताही कर लागणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
एखाद्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याला कोणतीही महागडी वस्तू वा मालमत्ता खरेदी करून दिल्यास तो एकप्रकारचा 'पुरवठा' मानला जाईल. अर्थातच त्यावर अन्य वस्तूंच्या पुरवठ्याप्रमाणे जीएसटी लागेल. त्यात ५० हजार रुपयांपर्यंत टॅक्स लागणार नसल्याचं समजतं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post