पुढील सहा महिन्यांमध्ये विराटच्या फक्त एका कंपनीचे उत्पन्न असेल 185 कोटी रु,
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - विराटचा विस्डेनने दशकातील टॉप- ५ क्रिकेटर्समध्ये समावेश केला आहे. त्याआधी नुकतेच फोर्ब्ज इंडियाच्या सेलिब्रिटी यादीतही टॉपवर राहिला होता. यंदा त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेंटीमध्ये सर्वाधिक २३७० धावा केल्या आहेत. सलग चौथ्या वर्षी त्याने एका वर्षात २००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मैदानाबाहेरही विराट यशाच्या पताका फडकवतोय. विराटने २०१४ मध्ये युनिव्हर्सल बिजसोबत 'राँग' ब्रँडला सुरुवात केली. तसेच त्याने २०१७ मध्ये हाँगकाँगची कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक कंपनी जीवासोबत टायअप करत 'म्यूव्ह अकॉस्टिक' ब्रँडची सुरुवात केली. हा एक शहरी ग्राहकांना समोर ठेवून सुरू केलेला ब्रँड आहे. त्याने मुख्यत्वे गुंतवणूक वन ८ नावाच्या ब्रँडमध्ये केली आहे. हा त्याने लाइफस्टाइल ब्रँड प्युमासोबत सुरू केला आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये सुरू केलेल्या या कंपनीचा महसूल जून २०१९ मध्ये १३० कोटी रुपये झाला. तर फोर्ब्जच्या वृत्तानुसार जून २०२० पर्यंत वन ८ चा महसूल १८५ कोटी होईल.
याबाबत बोलताना विराटने एका मुलाखतीत सांगितले होते की, २०१६ मध्ये मला वाटायचे माझ्यात आता १०-१२ वर्षांचे क्रिकेट शिल्लक आहे. यामुळे मला वाटले की, आता मला एक ब्रँड सुरू करायला हवा, कारण मला माझ्या करिअरच्या शेवटी करायचे नव्हते. आता माझ्याकडे वेळ आहे, संधी आहे की, माझा ब्रँड योग्य पद्धतीने पुढे जाऊ शकेल. वन ८ पादत्राणे, बॅकपॅक, टोपी, ट्रेनिंग बॅग्ज आणि मुलांचे कपडे विकते. नुकतेच कंपनीने अंतर्वस्त्रेही आणली आहेत. वन ८ ने शक्तिवर्धक पेय, फ्रॅगरन्स इत्यादींसाठीही दुसऱ्या कंपन्यांसोबत करार केला आहे. तसेच ऑडी, फ्लिपकार्ट, प्युमासारख्या सुमारे २२ ब्रँडला सहकार्य करत आहे.
विराटची कमाई
वन 8 ब्रँड 131 कोटी (जून २०१९ महसूल)
185 (जून २०२० महसूल, अपेक्षित)
वेतन 28.4 कोटी रुपये
एंडॉर्समेंट 149 कोटी रुपये
इन्स्टाग्राम 1.35 कोटी प्रति पोस्ट
Post a Comment