हैदराबादमध्ये विराट सुस्साट



माय अहमदनगर वेब टीम
हैदराबाद - भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिज संघावर ६ गडी राखून सहज मात केली आहे. कर्णधार विराट कोहलीची नाबाद ९४ धावांची खणखणीत खेळी आणि सलामीवीर लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने विंडीजचे २०८ धावांचे मोठे आव्हान १८.४ षटकांत सहज पार केले. भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात २०९ धावा करत विजय साकारला व मालिकत १-० अशी आघाडी घेतली.
दरम्यान शिमरॉन हेटमायर आणि एविन लुईसच्या दमदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने 20 षटकांत पाच बाद 207 धावांचा डोंगर उभारला होता. हेटमायरनं ट्वेन्टी ट्वेन्टी कारकीर्दीतले पहिले अर्धशतक झळकावताना 56 धावा कुटल्य़ा. त्याच्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. सलामीच्या लुईसनेही अवघ्या 17 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांसह 40 धावा फटकावल्या. तर कर्णधार कायरन पोलार्डने 37 धावांचं योगदान दिलं. त्यानेदेखील चार षटकार ठोकले. भारताकडून यजुवेंद्र चहलने 36 धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडले. तर वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक गडी बाद केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post