आजच्या विजयाने भारताच्या नावे विंडीजविरुद्ध सलग तिसरी मालिका
माय अहमदनगर वेब टीम
तिरुवनंतपुरम - भारत व वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळवला जाईल. भारत मालिकेत १-० ने पुढे आहे. टीमने हा सामना जिंकल्यास तो विंडीजविरुद्ध सलग तीन मालिका जिंकेल. यापूर्वी झालेल्या दोन मालिकेत भारताने ३-० व ३-० ने बाजी मारली आहे. दुसरीकडे, विंडीज संघ निकोलस पूरणचा संघात समावेश करू शकतो.
कोहलीने दुसरा टी-२० सामना जिंकल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, वनडे, टी-२०) सातवा सर्वात यशस्वी कर्णधार ठरेल. त्याच्या नेतृत्वात संघाने १६१ पैकी १०८ सामने जिंकले. पाँटिंग २२० विजयांसह अव्वलस्थानी आहे.
पाठलाग करताना विजयाचे याेगदान देताना काेहलीची सरासरी अाणि धावांची सर्वाधिक झाली नाेंद
फलंदाज : डाव : धावा : 50+ : सरासरी
विराट कोहली (भारत) : 24 : 1209 : 13 : 135
रोहित शर्मा (भारत) : 33 : 857 : 8 : 30
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) : 28 : 816 : 7 : 36
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) : 21 : 731 : 6 : 49
इयान मॉर्गन (इंग्लंड) : 22 : 651 : 4 : 59
भारत व वेस्ट इंडीज दुसरा टी-२० सामना
फिरकीपटू ठरणार महत्त्वाचे
ग्रीनफील्ड स्टेडियमवर मुश्ताक अली स्पर्धेचे १४ सामने झाले. यात फिरकीपटूंची सरासरी २०.८५ राहिली. अशात फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची ठरेल. भारत व वेस्ट इंडीज यांच्यात मैदानावर १ नोव्हेंबर २०१८ रोजी वनडे सामना झाला.
Post a Comment