...यांच्या प्रवेशासाठी शिवसेनेचे जोरदार प्रयत्न !




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या काळात मेगाभरतीने राजकारणात भाजपने वादळ निर्माण केलं होते. निवडणुकीच्या निकालानंतर सगळीच समिकरणे बदलली आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत आले.

त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची गोची झालीय. तर भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या नेत्यांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले आहे.


या सगळ्या असंतुष्टांचे नेतृत्व ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याकडे आलेय. खडसेंची ही अस्वस्थता गेली चार वर्षांपासून असून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शिवसेनेने सुरू केल्याची माहिती मिळतेय.

खडसे हे भाजपचे दिग्गज नेते असून गेली 40 वर्ष त्यांनी महाराष्ट्रात भाजप रुजविण्यासाठी मेहनत घेतली. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाने मुख्यमंत्रिपदाची माळ ही देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात घातली.

त्यामुळे खडसे अस्वस्थ होते. त्यानंतर त्यांनी फडणवीसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केलेत. त्यामुळे खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप होताच त्यांना राजीनामा द्यायचा भाग पाडण्यात आले होते.

त्यानंतर यावेळी विधानसभा निवडणुकीतही त्यांना तिकीटही नाकारण्यात आले. त्यांच्या ऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आले आणि त्यात त्यांचा पराभव झाला.

त्यामुळे खडसे प्रचंड अस्वस्थ आहेत. बदलती राजकीय समिकरणे लक्षात घेऊन शिवसेनेें काही नेत्यांवर खडसेंशी बोलण्याची जबाबदारी सोपवली अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली. त्यामुळे पुढच्या काळात भाजपला धक्के बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post