मुंबई - मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत वर्षा बंगल्याच्या भिंतींवर लिहीलेला मजकूर आश्चर्यचकीत करणारा दिसून येत आहे.
वर्षा बंगल्याच्या आतील भिंतींवर भाजप रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स असे शब्द लिहिलेले आहेत. तर भिंतींवरील काही वाक्यांत यूटी वाईट आहेत (UT is mean), असा उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, यूटी म्हणजे नेमके काय अशा चर्चांना आता सुरुवात झाली असून राजकारण कुठल्या स्तरावर जाऊन पोहोचले आहेत यावरून घमासान माजले आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वर्षा बंगला सोडला तेव्हा भिंतीवर काहीच लिहिलेले नव्हते. बंगला सोडताना अशी कुठलीही वाक्य बंगल्यातील भिंतींवर लिहिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Post a Comment