इंटरनेट वापरात भारतीयांचा नवा रेकॉर्ड; पहा ‘किती’ डेटा केला गुल
माय अहमदनगर वेब टीम
दिल्ली - इंटरनेट वापराच्या बाबतीत भारतीय लोक नेहमीच चर्चेत असतात. सध्या इयर एन्ड सुरु असल्याने एक अहवालानुसार सर्वात जास्त इंटरनेट २०१९ या वर्षात वापरण्यात आलेले आहे. ट्राय च्या अहवालानुसार २०१४ साली ८२८ मिलियन गेगाबाईट्स, त्यानंतर २०१८ मध्ये त्यामध्ये वाढ होऊन ते ४६, ४०४ मिलियन गेगाबाईट्स इतका वापर करण्यात आला आहे. हे सर्व रेकॉर्ड यावर्षी तोडण्यात आले असून २०१९ च्या सप्टेंबरपर्यंत भारतात तब्बल ५, ९१७ मिलियन गेगाबाईट्स इतका इंटरनेट डेटा वापरण्यात आलेला आहे.
दरम्यान इंटरनेट वापरामध्ये भारत अग्रेसर असून दर सेंकदाला यामध्ये वाढ होताना दिसत आहे. इयर एन्ड निमित्ताने ट्राय ने हा अहवाल दिला असून यामुळे भारतीयांची इंटरनेट वापराची संख्या झपाट्याने वाढत आहे. २०१४ मध्ये वायरलेस डेटा धारकांची संख्या २८१. ५८ मिलियन इतकी होती त्यामध्ये वाढ होऊन सप्टेंबर २०१९ हि संख्या ६६४.८० मिलियन इतकी झाली. २०१८ मध्ये भारतीयांनी ४६, ४०६ मिलियन जीबी देत वापरला होता. तर २०१७ मध्ये हाच आकडा वाढून २०, ०९२ इतका होता.
ट्राय ने सांगितले कि मागील चार वर्षात वायरलेस डेटा चा वापर संवाद आणि मनोरंजासाठी अधिक वापर करण्यात आला. यामुळे डेटा वापरात झपाट्याने वाढ झाली. नव्या टेलिकॉम कंपन्यांचा प्रवेशन नवे तंत्रज्ञान, स्वस्त स्मार्टफोन्स, स्वस्त इंटरनेट प्लॅन्स यामुळे इंटरनेट वापरात वृद्धी झाली. देशातील अनेक ठिकाणी असणाऱ्या नेटवर्कच्या समस्या नव्या टेलिकॉम कंपन्यांनी सोडविल्या. या ठिकाणी स्वस्तात असलेले नेटवर्क लावून अधिकाधिक लोकांना जोडण्याचे काम या कंपन्यांनी केले. स्वस्त मिळणाऱ्या स्मार्टफोनमुळे ग्राहकांची संख्या वाढली. परिणामी इंटरनेट वापर वाढला. यामुळे भारतात अधिकाधिक लोकांचा वावर इंटरनेटमुळे वाढला.
Post a Comment