बजाज चेतकमध्ये मिळेल लाइव्ह ट्रॅकिंग; जानेवारीमध्ये होईल लॉन्च




माय अहमदनगर वेब टीम
ऑटो डेस्क - देशातील प्रसिद्ध मोटारसायकल कंपनी बजाज ऑटो आपली लोकप्रिय स्कूटर चेतकचे इलेक्ट्रिक व्हर्जन जानेवारीमध्ये सादर करणार आहे. या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लाइव ट्रॅकिंग फीचर बसवण्यात आले आहे. तुम्ही तुमच्या स्कूटरला स्मार्टफोनमधून ट्रॅक करू शकता.

कंपनीने याला एक प्रिमीयम स्कूटर म्हणून बाजारात आणणार आहे. यामुळेच या स्कूटरमध्ये काही अत्याधुनिक फीचर्स असणार आहेत. यात रिव्हर्स ड्रायविंग फीचरदेखील देण्यात आले आहे. हे फीचर पार्किंगसाठी उपयोगी ठरेल. कंपनीने यात आयपी 67 रेटेड लिथीयम-ऑयन बॅटरी लावली आहे. एका फूल चार्जमध्ये ही स्कूटर 95 किमी आणि स्पोर्ट मोडमध्ये 85 किमीपर्यंत चालू शकते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post