मुख्यमंत्र्यांनी दिलेला बंगला माधुरीने विकला
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर लोकप्रिय असलेल्या माधुरीने आपला बंगला विकला आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेला बंगला माधुरीने विकल्यामुळे सगळीकडे याची जोरदार चर्चा रंगली आहे. माधुरीने हरियाणाच्या पंचकूलाच्या एमडीसी सेक्टर 4 मधील बंगला क्रमांक 310 हे घर विकलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधुरीने हा बंगला 3.25 करोड रुपयांत विकला आहे. हा बंगला माधुरीला हरियाणातील माजी मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांनी मुख्यमंत्री कोट्यातून दिला होता.
गेल्या महिन्यात या संदर्भात माधुरीचे पती डॉ नेने देखील हरियाणात गेले होते. याच दरम्यान बंगल्याचा व्यवहार पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. 1996 मध्ये माधुरीला हा बंगला देण्यात आला होता.
Post a Comment