...तर मग मनापासून करा ध्यान...!!
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - धकाधकीच्या जीवनात मनाला शांत ठेवणे फारच गरजेचे आहे. मन शांत राहिले तर शरीर स्थिर राहते आणि शरीर स्थिर राहिले की मेंदू वेगाने काम करतो आणि जीवन संतुलित राहते. त्यामुळे मनापासून ध्यान करायला हवे. यामुळे मनावर नियंत्रण मिळवता येते. आज जगाच्या १३० देशांतील लोक मनापासून ध्यान धारण करत आहेत.
संशोधनातून समोर आले...
अमेरिकेच्या वेलस्पेन यॉर्क हॉस्पिटलमध्ये झोप न येणाऱ्या लोकांवर एक संशोधन करण्यात आले. या संशोधनात २८ लोकांना ठेवण्यात आले होते. त्या सर्वांना क्रोनिक इनसोम्नियाचा आजार होता. ८ आठवड्यांपर्यंत या सर्व सहभागींना मनापासून ध्यान करण्यास सांगितले गेले. त्यांची पूर्व आणि नंतर सर्व तपासणी करण्यात आली. त्यानंतर या लोकांमधील आजार वैज्ञानिकांना निम्म्याने कमी झाल्याचे आढळले. यातील काही रुग्णांनी सरावानंतर फार्माकोलॉजिकल उपचारही बंद केले.
ध्यान करण्याची पद्धत
ध्यानासाठी पद्मासन, सिद्धासन किंवा कोणत्याही सुखद आसनात बसावे. ज्यामध्ये पाठीचा कणा सरळ असेल. डोळे शांत मिटलेले असतील आणि दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये असतील. आता डोळे बंद केल्यानंतर एकाग्रतेसाठी आनापान सती ध्यानाचा अभ्यास करावा. आनापान सती म्हणजे श्वास घेणे, श्वास सोडणे याकडे मानसिकरीत्या लक्ष ठेवणे, श्वास येत आहे, श्वास जात आहे. याशिवाय दुसरा कुठलाच विचार डोक्यात येता कामा नये. हा अभ्यास दररोज २० मिनिटे सातत्याने तीन महिने केल्यास ध्यानाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकतेवर परिणाम दिसून येतो.
नकारात्मक विचार दूर ठेवते
नियमित ध्यान केल्याने नकारात्मक विचार येत नाहीत. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते. त्यामुळे त्यातून आत्मशक्ती, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य, मन:शांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते. त्यामुळे नकारात्मक विचार मनात येत नाहीत. जे लोक आत्महत्येचा विचार करतात किंवा थोडाही तणाव आला तर खचतात, अशा लोकांनी रोज ध्यान करायला हवे.
ध्यानामुळे होतात हे फायदे
ध्यानामुळे ताणतणाव दूर होतो. - मेंदूची कार्यक्षमता वाढते. - चिडचिड कमी होते. - महिलांमध्ये मासिक पाळीमधील चिडचिड कमी होते. - लहान मुलांच्या वागण्या,बोलण्यात, अभ्यासावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. वयोमानानुसार मेंदूची झीज होते. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होते. अशा वेळी ध्यानाचा अभ्यास केल्यास सकारात्मक बदल दिसून येतो. ज्याप्रमाणे शरीराला टिकवण्यासाठी अन्नाची गरज असते त्याप्रमाणे या शरीरामध्ये आत्मा दीर्घकाळपर्यंत टिकावा यासाठी ध्यान करण्याची गरज असते.
वाईट सवयी सुटतात
लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तीची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ती मिळवतात आणि सर्व इच्छा नाट्यपूर्ण रीतीने प्रत्यक्षात येतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी सुटतात
Post a Comment