‘त्या’ शेतकऱ्यांचाही कर्जमाफीत समावेश करावा






माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -  'सरकारने शेतकऱ्यांना सपूर्ण कर्जमाफी करण्याचे ठरविले आहे. ही कर्जमाफी देताना मध्यम मुदत कर्ज तसेच उपसा जलसिंचन योजनेचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफीत समावेश करण्यात यावा,' अशी मागणी आमदार अरुण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. जगताप यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.
राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून या सरकारमध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांचा समावेश आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीबाबत मोठा निर्णय या सरकारकडून घेतला जाणार असल्याचे सातत्याने सांगण्यात येत आहे. त्यातच विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन कर्जमाफीमध्ये मध्यम मुदत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश करावा, अशी मागणी केली आहे. राज्यात तसेच नगर जिल्ह्यात गेली काही वर्ष लहरी हवामानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नापिकी तसेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देताना त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांवर मध्यम मुदत कर्ज, उपसा जलसिंचन योजनेचे कर्ज आहे, अशा शेतकऱ्यांचा समावेश करून त्यांना योग्य न्याय द्यावा, असेही जगताप यांनी दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post