3 डिसेंबरपासून व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलचे दर 40 टक्क्यांनी वाढणार, तर 6 डिसेंबरपासून जिओचे प्लान 50% महागणार



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - आता देशात स्वस्त कॉलिंगचा टप्पा संपुष्टात येणार आहे. कारण प्रमुख दूरसंचार कंपन्या व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलने मोबाइल टॅरिफ दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. रविवारी दूरसंचार कंपन्यांनी नवी प्लॅन सादर केले आहेत. या नवीन प्लॅनमध्ये कॉल दरांसह इंटरनेट डेटाचे दर वाढवण्यात आले आहे. तर रिलायन्स जिओने देखील 6 डिसेंबरपासून दरांमध्ये वाढ होणार असल्याची घोषणा केली आहे. यानंतर जिओचे प्लॅन 50 टक्क्यांनी महाग होऊ शकतात. कंपन्यांनी अन्य ऑपरेटरवरील कॉल करण्याची मर्यादा (ऑफ नेट) देखील निश्चित केली आहे.

व्होडाफोन-आयडियाने रविवारी प्रीपेड सेवांसाठी 2, 28, 84 आणि 365 दिवसांची वैधता असणारे नवी प्लॅन जारी केले. हे प्लॅन जुन्या प्लॅनपेक्षा 40 टक्क्यांनी महाग आहेत. एअरटेलचा टॅरिफ प्रतिदिन 50 पैशांपासून 2.85 रुपये इतके महाग झाले आहे. व्होडाफोन-आयडियाने ऑफ नेट कॉल मर्यादा निश्चित केली आहे. तर एअरटेलने निश्चित सीमेपेक्षा जास्त वेळ ऑफ नेट कॉल केल्यास 6 पैसे प्रति मिनिटाचे शुल्क वसुल करणार असल्याचे सांगितलेे.

रिलायन्स जिओने लागू केली फेअर यूज पॉलिसी
भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये सर्वाधिक वाटा असणार्‍या रिलायन्स ग्रुपच्या जिओनेही 6 डिसेंबरपासून मोबाइल दर वाढवणार असल्याचे सांगितले आहे. कंपनीने वेगवेगळ्या प्लॅनमध्ये 40 टक्क्यांपर्यंत वाढीची घोषणा केली आहे. असे असले तरी नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांना 300 टक्के अधिक लाभ मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने फेअर यूज पॉलिसीअंतर्गत अन्य ऑपरेटरना कॉल करण्याची मर्यादा निश्चित केली आहे, जी अनलिमिटेड प्लॅनवर लागू असेल.

सर्वच कंपन्यांनी मोबाइल दर वाढवले
दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धेमुळे कंपन्यांना तोटा सहन करावा लागत होता. सरकारी शुल्क भरण्याच्या आदेशाने कंपन्यांवर अतिरिक्त भार पडला आहे. याची भरपाई करण्यासाठी खासगी क्षेत्रातील सर्व प्रमुख कंपन्या मोबाईल दरात वाढ करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post