नगरच्या दोघा शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - भारत सरकारच्या मानव संसाधन व विकास मंत्रालय व शिक्षण विभागच्यावतीने देण्यात येणारा आयसीटी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार यावर्षी कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंडगरवस्ती येथील शिक्षक विक्रम अडसूळ आणि जामखेड तालुक्यातील सरदवाडी येथील उपाध्यापक रविंद्र भापकर यांना जाहिर झाला आहे. देशातील 43 व राज्यातील 3 शिक्षकांना हा सन्मान दिला जाणार असून यात नगर जिल्ह्यातील दोघे तर बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाचा समावेश आहे.

या पुरस्काराचे वितरण 23 डिसेंबरला डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल भवन, नवी दिल्ली येथे होणार आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरील असल्यामुळे याला विशेष असे महत्व आहे. शिक्षक अडसूळ यांच्या या पुरस्काराच्या रूपाने पुन्हा एकदा नगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मागील वर्षी अडसूळ यांना राज्यातून एकमेव राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्काराने भारत सरकारने गौरवले होते. अडसूळ हे कर्जत तालुक्यात दुर्गम भागातील झेडपीच्या शाळेत ज्ञानदानाचे कार्य करतात. त्यांनी आतापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यांना संपूर्ण भारतभर उपक्रमशील, प्रयोगशील व तंत्रस्नेही शिक्षण म्हणून ओळखले जाते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post