माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना न्यायालयाचा दणका, 4 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश
माय अहमदनगर वेब टीम
नागपूर - निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी प्रकरणांची माहिती लपवल्याप्रकरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर कोर्टाने 4 जानेवारी 2020 ला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणात फडणवीसांनी न्यायालयात हजर राहण्यास सूट मागितली होती. दरम्यान, दोन्ही बाजुच्या युक्तिवादानंतर न्यायदंडाधिकारी एस. डी. मेहता यांनी 4 जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे.
तत्पूर्वी, फडणवीस यांचे वकील उदय डेबल यांनी या प्रकरणात फडणवीसांना काही काम असल्याने ते कोर्टात हजर राहू शकत नाही, त्यामुळे त्यांना सूट मिळावी अशी न्यायालयाकडे विनंती केली होती. ते म्हणाले की, फडणवीस यांना काही अपरिहार्य कार्यामुळे न्यायालयात हजर राहता येणार नाही. फडणवीस काही वादग्रस्त व्यक्ती नाहीत, त्यांच्या अनुपस्थितीमुळे कोर्टाच्या कामकाजात थोडाही अडथळा निर्माण होणार नाही. दरम्यान, नागपूरमधील वकील सतीश उके यांनी फडणवीसांविरोधात फौजदारी कारवाई सुरू करावी, आणि अजामीनपात्र वॉरंट जारी करावा, या मागणीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
Post a Comment