हिवाळ्यात सनस्क्रिन वापरणे गरजेचे
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - सनस्क्रिन केवळ उन्हाळ्यातच लावायचे असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण असे अजिबात नाही. हिवाळ्यातदेखील सनस्क्रिन वापरणे गरजेचे आहे. या ऋतूमध्ये सूर्याची किरणे ही अत्यंत परिणामकारक असतात. यामुळे त्वचा अधिक टॅन आणि डॅमेज होते. म्हणून तुम्ही नेहमी हिवाळ्यातही सनस्क्रिन वापरायला हवे. खरं तर हिवाळ्यात त्वचा अधिक कोरडी पडते. त्यामुळे ती टॅनही होते. पण सनस्क्रिनचा वापर केल्यानंतर त्वचा अधिक सुरक्षित राहते आणि कोरडेपणा निघून जाण्यासही मदत होते. उन्हाळ्यात जर सनस्क्रिन वापरत असाल तर ते हिवाळ्यातही वापरायला हवे. त्याचा त्वचेसाठी अधिक फायदा होतो.
खरं तर सनस्क्रिनची जास्त गरज भासते ती हिवाळ्यात. हिवाळ्यात उन्हाळ्यापेक्षा कमी ऊन असते हे मान्य केले तरीही थंडीमध्ये अधिक गारवा असल्याने त्वचा अधिक प्रमाणात टॅन होते. त्यामुळे या टॅनिंगपासून आणि थंड बोचऱ्या हवेपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रिनचा उपयोग करता येतो.
ही पेस्ट लावा
हिवाळ्यात त्वचेला जास्त काळजीची गरज असते. त्यामुळे मास्क हा चांगला पर्याय आहे. अव्होकॅडो, मध, कोरफड अथवा केळ्याचा मास्क अशा नैसर्गिक गोष्टींचा मास्क त्वचेसाठी जास्त फायदेशीर ठरतो. हा फेसमास्क लावण्यासाठी या सगळ्या वस्तू मिक्स करून ब्लेंड करून घ्या आणि त्याची क्रिमी पेस्ट बनवा. ही पेस्ट ३० मिनिट्स चेहऱ्याला लावा. याचा परिणाम चेहऱ्यावर चांगला होतो.
बॉडी लोशनचा वापर करा
हिवाळ्यात जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा कोरडी होते. त्यामुळे हिवाळ्यात कोमट पाण्यानेच अंघोळ करा. तेदेखील केवळ दहा मिनिट्स. जास्त वेळ अंघोळ करत बसू नका. हिवाळ्यात त्वचा बॉडी लोशन योग्य तऱ्हेने अब्झॉर्ब करून घेत नाही. त्यामुळे अंंघोळ केल्यानंतर लगेचच बॉडी लोशन लावा. कारण अंघोळ केल्या केल्या शरीरातील सर्व पोअर्स हे खुले असतात. त्यामुळे त्वचेवर लोशनचा चांगला परिणाम होतो.
Post a Comment