पेपरडीश उद्योग……



माय अहमदनगर वेब टीम
भारतीय संस्कृतीमध्ये पिढ्यान पिढ्या द्रोण व पत्रावळींचा उपयोग केला जाते. मोठमोठ्या सांस्कृतिक कार्यांमध्ये, धार्मिक समारंभामध्ये, लग्न, वास्तुशांतीसारख्या घरगुती कार्यक्रमांमध्ये, मोठ्या जेवणावळींमध्ये लोकांना जेवण देताना पेपरडिशचा उपयोग करतात. जेवलेली ताटे धुवायचा मोठा प्रश्न असतो. कार्यक्रमात सगळेच पाहुणे, मग ताटे धुवायची कुणी म्हणून पेपरडिशचा उपयोग करतात.

उद्योग – केळीच्या, किंवापळसाच्या पानांपासुन द्रोणपत्रावळी बनवणारी काहीं कुटुंबे सर्व धर्मांमध्ये आढळतात. वृक्षसंवर्धनाचे काही नियम शासनाने जारी केलेमुळे व पळसाची पाने मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसलेले उपलब्ध असणारा कच्चा माल कागद किंवा प्लास्टीक पिशव्यांपासून आजकाल द्रोण पत्रावळी बनवतात, व या असतातही आकर्षक सुंदर व व स्वस्त. मागणी मोठ्या प्रमाणावर आहे परंतु पळ्साची पाने तितक्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. म्हणुन आज सर्रास पेपर डीशचाच वापर करतात. स्वस्त सुंदर व युज  अन्ड थ्रो स्वरूपाच्या असतात.हा उद्योग महिला व बचत गटांमार्फत सुध्दा आपणांस करता येतो. त्यामुळे महिलाना एक चांगले

रोजगारांचे साधान मिळू शकते. तसेच या उद्योगांसाठी अत्यंत कमी भांडवल लागत असल्यामुळे हा व्यवसाय कोणीही करू शकतो. पेपर डिशही वर्षभर वापराता येत असल्यामुळे या उद्योगाला कोणाताही तोटा होत नाही.

बाजारपेठ – पेपरडिश विक्रीकरिता प्रत्येक घर हे आपले ग्राहक आहे. किराणा मालाची दुकाने स्टेशनरी, ठोक व्यापरी, किरकोळ दुकान तसेच प्लास्टिक मटेरियलाच्या दुकाना मध्ये पेपर डिश आपणांस विक्रीसाठी ठेवता येतात. द्रोण, पत्रावळी विकणाऱ्या फिरतया विक्रेत्यांकडेही उत्पादन आपणांस विकता येते. तसेच द्रोण पत्रावळी विकणारे काही होलसेल व्यापारी विविध  मंगल कार्यालया जवळ असतात. त्याच्याकडे सुध्दा पेपरडिश विक्रीसाठी ठेवता येतात. त्याबरोबरच मंगल कार्यालये सांस्कृतिक भनव यांच्या मॅनेजर्सना भेटुन सुध्दा आपला पेपर डिश बद्दल सांगावे. केटरर्स आचारी यांनाही भेटून पेपरडीश बद्दल आर्डर आपणांस मिळू शकतात.

प्रकल्पविषय – हा उद्योग उभारणीसाठी ४० ते ५० हजार रूपय खर्च येतो. उद्योग सुरु झाल्यावर खर्च कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. तसेच हा व्यवसाय सुरु केल्यावर आपणांस चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे आपणा एक चांगले उद्योग बनू शकता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post