त्याच्यावर कारवाई सुरूच
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - प्लास्टिकबंदी दंडात्मक कारवाई नगरमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच असून शनिवारी सुमारे महापालिकेने २६ हजार ८५० रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे.
सरकारच्या आदेशानुसार प्लास्टिक वापरावर बंदी असतानाही नगर शहरामध्ये सर्रास प्लास्टिकचा वापर सुरू आहे. प्लास्टिकबंदी कायदा लागू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात महापालिका प्रशासनाने उत्साहाने ८-१० दिवस मोहीम राबवून दंड वसुली केली होती. परंतु त्यानंतर ही कारवाई थंडावल्याने सर्रास प्लास्टिकचा वापर सुरू झाला होता. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाची सुत्रे आल्यानंतर त्यांनी विशेष मोहीम राबवत प्लास्टिकबंदी दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेकडून या कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर गुरुवारपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करीत गुरुवारी सुमारे ९१ हजार व शुक्रवारी सुमारे २७ हजारांच्या दंडाची वसुली करण्यात आली होती. महापालिकेने शनिवारी देखील आपली कारवाई सुरूच ठेवली असून २६ हजार ८५० रुपये दंडाची वसुली केली आहे.
वापर होऊ लागला कमी
प्लास्टिकबंदी दंडात्मक कारवाई सुरू झाल्यामुळे आता रस्त्यावर बसणारे भाजी, फळ विक्रेते सावध होऊ लागले आहेत. या विक्रेत्यांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर हा कमी होऊ लागला आहे. तर, काही विक्रेत्यांकडून अद्यापही प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जात आहेत. खरेदीला येणाऱ्या ग्राहकांना या पिशव्या दिसू नयेत, यासाठी मात्र त्या लपून ठेवण्यात येत आहेत. एखाद्या ग्राहकाने जास्त आग्रह केल्यानंतरच पिशवी दिली जात आहे.
Post a Comment