रोहित शर्मानं 'अशी' घेतली केदार जाधवची 'विकेट'




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मैदानात प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची बॅटनं धुलाई करणारा रोहित शर्मा सध्या सोशल मीडियावर जोरदार 'बॅटिंग' करत आहे. गोलंदाजांच्या बाऊन्सरवर उत्तुंग षटकार ठोकणाऱ्या रोहितनं आपला संघ सहकारी केदार जाधवच्या एका 'क्लिक'वर जबरदस्त टोलेबाजी केली आहे. केदार जाधवनं इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला. त्या फोटोला रोहितनं फलंदाजीप्रमाणं अचूक टायमिगं साधत गंमतीशीर प्रतिसाद दिला आहे.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी केदार जाधव सज्ज झाला आहे. सध्या तो कसून सराव करत आहे. पुण्याच्या एमसीए मैदानात फलंदाजीचा सराव करण्याआधी त्यानं एक फोटो काढून घेतला होता. तो त्यानं इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला. पुन्हा एकदा मैदानात उतरताना आणि आपल्या आवडीची गोष्ट करताना खूपच छान वाटत आहे, अशा भावना त्यानं व्यक्त केल्या. केदारच्या या पोस्टवर रोहित शर्मानं गंमतीनं प्रतिक्रिया दिली आहे. 'पोझ कम मार, बॅटिंग कर ले थोडा' असा सल्ला त्यानं दिला आहे. रोहितच्या या अचूक टायमिंगवर सोशल मीडियात चांगलीच खसखस पिकली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post