शरीराची चिरफाड न करता होईल पोस्टमॉर्टम



माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले की, शवविच्छेदन करण्यासाठी आता शरीराची चिरफाड करण्याची गरज नसेल. एक नवीन तंत्र विकसित केले आहे, ज्यात चिरफाडल केल्याशिवाय पोस्टमॉर्टम केले जाऊ शकते. सभागृहात प्रश्नोत्तरादरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, दिल्लीमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(एम्स) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने मिळून एक असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्याच्या मदतीने चिरफाड केल्याशिवाय शरीराचे परिक्षण करता येते. पुढील सहा महिन्यात या तंत्रज्ञानाच्या आधारे मृतदेहांचे परीक्षण करणे सुरू होईल. याच्या मदतीने अनेक सूचना आणि माहिती डिजिटल पद्धतीने स्टोर करता येईल.

हे तंत्रज्ञान सुरुवातील दिल्लीतील एम्समध्ये लागू केले जाईल. त्यानंतर हळु-हळू देशातील इतर रुग्णालयातही लागू होईल. या तंत्रज्ञानात मानवीय दृष्टीकोणतून बनवण्यात आले आहे. दक्षिण आशियात हे तंत्रज्ञान वापरणारा भारत पहिलाच देश आहे. हे तंत्रज्ञान सध्या जर्मनी, नार्वे, इजरायल, स्वीडन, ब्रिटेन आणि हॉगकॉगमध्ये वापरली जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post