लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – महाराष्ट्र शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येत असून सन 2020 या वर्षामधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर झाले आहे.

आयोगाने जाहीर केलेल्या परीक्षांच्या कार्यक्रमानुसार राज्य सेवा पूर्व परिक्षा 5 एप्रिल व मुख्य परीक्षा 8, 9 व 10 ऑगस्टला होणार आहे. यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 1 मार्च व मुख्य परिक्षा 14 जून, सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परिक्षा 15 मार्च व मुख्य परीक्षा 12 जुलै, महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवार 3 मे व मुख्य परीक्षा संयुक्त 6 सप्टेंबर, पोलीस उपनिरीक्षक 13 सप्टेंबर, राज्य कर निरीक्षक 27 सप्टेंबर, सहायक कक्ष अधिकारी 4 ऑक्टोबर, महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा 10 मे व मुख्य परिक्षा 11 ऑक्टोबर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 17 मे व मुख्य परीक्षा संयुक्त 18 ऑक्टोबर, महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 7 जून व मुख्य परीक्षा 29 नोव्हेंबर, लिपिक-टंकलेखक 6 डिसेंबर, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क 13 डिसेंबर, कर सहायक 20 डिसेंबर, महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा 5 जुलै व मुख्य परीक्षा 1 नोव्हेंबर, सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा 28 नोव्हेंबर रोजी होईल.

शासनाकडून संबधित संवर्ग, पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल, या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यांमध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल.

वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना, दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. संबंधित परीक्षेची परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशिल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post