माय अहमदनगर वेब टीम
बॉलिवूड डेस्क - बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर त्यांच्या आगामी 'पानिपत' हा चित्रपट येत्या 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होतोय. पण प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या सोशल मीडिया युजर्सनी ट्रेलरवरुन नाराजी व्यक्त केली होती, तर पानिपतकार म्हणून प्रसिद्ध असलेले लेखक विश्वास पाटील यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर कथा चोरीचा आरोप लावला. इतकेच नाही तर चित्रपटातील संवादावरुनही वादंग उठले होते. पण आता आशुतोष गोवारीकर यांच्या या चित्रपटाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा चित्रपट केवळ मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी पहायला हवा, असे आवाहन केले आहे.
राज ठाकरे म्हणतात... ''पानिपतची लढाई ही म-हाठेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपवणा-या मरहट्ट्यांच्या शौर्याचा आविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटकेपार झेंडा नेणारी म-हाठेशाही कुठे आणि का कमी पडली? हे पाहण्यासाठी पानिपतच्या लढाईकडे पहावंच लागेल. त्यासाठीचा उपलब्ध होत असलेला ध्वनिचित्र दस्तावेज म्हणजे माझे मित्र श्री. आशुतोष गोवारीकर ह्यांचा 'पानिपत' चित्रपट. फक्त प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी देखील पहायला हवा.''
Post a Comment