रस्त्यावर रिसेप्शन : संपूर्ण कुटुंबावर गुन्हा
माय अहमदनगर वेब टीम
कोपरगाव - कोपरगाव शहरातील वास्तव चौक, कोर्ट रोड येथे रस्त्यात पोलीस विभागाची परवानगी न घेता मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आपले जवळच्या नातेवाईकांना जमवून लग्नाचे रिसेप्शन साजरे करणार्या कुटुंबाला ही बाब चांगलीच महागात पडली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी याप्रकरणी नितीश अशोकराव बोरुडे, अतिश अशोकराव बोरुडे, सतीश अशोकराव बोरुडे, अशोक सिद्धू बोरुडे, स्नेहा अतीश बोरुडे, विक्रम बाळासाहेब मासाळ या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने सार्वजनिक रस्त्यावर बेशिस्त वर्तन करणार्या प्रवृत्तीत चांगलीच खळबळ उडाली आहे.
सार्वजनिक जागा लोकांच्या हितासाठीच वापराव्यात. सरकारने बरेच नियम बनवले आहेत, पण त्या नियमांचं पालन कोणीच करत नाही. सगळेच जण आपल्या खासगी कामांसाठी सार्वजनिक जागेचा वापर करतात. कोपरगावात शहर पोलीस गस्त घालत असताना वास्तव चौकात असाच रस्त्याचा दुरुपयोग आढळल्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पो, कॉ. रामकृष्ण गोरख खारतोडे यांनी चक्क अख्ख्या कुटुंबावरच गु.र.न.397/2019 भादंवि 341, 283, महा.पोलीस अधिनियम 37(1)(3) अन्वये जिल्हा दंडाधिकारी अहमदनगर यांचेकडील आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. हे.कॉ. एस. एच. गायमुखे हे करीत आहे. त्यामुळे रस्त्यांचा कसाही वापर करणार्या अपप्रवृत्तीस चांगलाच चाप बसण्यास मदत होणार आहे.
Post a Comment