माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - सायन्स ऑलिम्पियाड, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल जनरल नॉलेज परीक्षेत श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला (माध्यमिक), सावेडी या शाळेचा विद्यार्थी यश मनोज सरसमकर (इयत्ता नववी) या विद्यार्थ्यास गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे. ही परीक्षा ऑक्टोबर-2019 मध्ये घेण्यात आली होती.
या भरघोस यशाबद्दल यश सरसमकर या विद्यार्थ्याचे शालेय समिती चेअरमन अॅड. किशोर देशपांडे, शालेय समिती चेअरमन (प्राथमिक) सुरेश क्षीरसागर, व्हा. चेअरमन डी. आर. कुलकर्णी, उपाध्यक्ष भा. ल. जोशी, सेक्रेटरी प्र. स. ओहोळ, खजिनदार सतीशचंद्र कुलकर्णी, स्वप्नील कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका संगीता जोशी, प्राथमिकचे मुख्याध्यापक डी. एम. कासार व संस्थेच्या पदाधिकार्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. विद्यार्थी यश सरसमकर यास अरुण राशीनकर व स्वप्ना कुलकर्णी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.
Post a Comment