हैदराबादेत तिला जाळले, उद्या मलाही जाळतील; पण मी लढेन, व्हेटरनरी डॉक्टर महिलेस जाळून मारल्याचा संसदेबाहेर निषेध करणाऱ्या तरुणीचा निर्धार
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली/ हैदराबाद - हैदराबादेत सामूहिक बलात्कारानंतर २७ वर्षीय व्हेटरनरी डॉक्टरला जाळल्याच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने होत आहेत. आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी करत हैदराबाद आणि तेलंगणाच्या अनेक भागात लोक रस्त्यावर उतरले. दरम्यान, दिल्लीत अनू दुबे नावाच्या मुलीने एकटीने संसद भवनाबाहेर निषेधार्थ धरणे आंदोलन केले. 'माझ्या भारतात मला सुरक्षित का वाटत नाही?' असा फलक तिने हातात धरला होता. पोलिसांनी तिला ताब्यात घेत ठाण्यात नेले. चार तासांनी आंदोलन न करण्याच्या अटीवर तिला सोडून देण्यात आले. अनूने आरोप केले की, तिला चांगली वागणूक दिली नाही आणि मारहाण झाली. तिला खाली झोपवून तीन महिला हवालदार तिच्या अंगावर बसल्या. नखांनी ओरबाडले आणि मारहाण केली. अनूच्या हातावर जखमा होत्या. अनूने सांगितले, मला कोणी जाळून मारू नये यासाठी मी हे करते आहे.
न्यायालयाने शनिवारी चारही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांना सुरक्षा व्यवस्थेत शादनगर ठाण्यातून चंचरगुडा कारागृहात नेण्यात आले.
वकिलांनी हा खटला लढवणार नसल्याचे सांगितले आहे. शादनगर बार असोसिएशनने म्हटले की, आरोपींना कसलीही कायदेशीर मदत दिली जाणार नाही.
पीडितेला न्याय देण्यासाठी चेंज डॉट ऑनलाइन वेबवर नमूद ऑनलाइन याचिकेवर ३ लाख स्वाक्षऱ्या झाल्या.
Post a Comment