माय अहमदनगर वेब टीम -
आपलं सौंदर्य सर्वांनाच प्रिय असतं. ते जपणं आपल्याच हाती असतं. दाट आणि काळ्या केसांसाठी तेलाचा वापर जसा महत्वाचा असतो, तसंच काही तेल हे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात. आज जाणून घेऊ काही तेलांविषयी...
1) खोबऱ्याचं तेल : खोबऱ्याच्या तेलाचा असा फायदा आहे कि, यातील पोषक तत्त्वांमुळे त्वचा मुलायम आणि निरोगी राहते.
2) ऑलिव्ह ऑईल : ऑलिव्ह ऑइल मध्ये व्हिटॅमिन इ आणि पॉलिफेनॉल्स असतात ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा चकाकते.
3) बदामाचं तेल : बदामाच्या तेलाने हृदय निरोगी राहते. व्हिटॅमिन इ, फॅटी ऍसिड या तत्त्वांमुळे बदामाचे तेल त्वचेवर सुद्धा फायदेशीर असते. या तेलाने त्वचा निरोगी रहाते आणि केस देखील मजबूत होतात.
4) त्वचेवर कोणत्याही प्रकारचे तेल लावताना ते रात्री लावले जाईल याची काळजी घेण्यात यावी.
Post a Comment