भारताने 77 पदक जिंकून पहिले स्थान मिळवले, गुरुवारी वेटलिफ्टिंगमध्ये दोन सुवर्ण पदकांची कामगिरी




माय अहमदनगर वेब टीम
स्पोर्ट डेस्क - भारत-नेपाळमध्ये सुरू असलेल्या साउथ एशियन गेम्समध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. भाराताने आतापर्यंत 77 मेडल्स जिंकले आहेत. यात 36 गोल्ड, 28 सिल्वर आणि 13 ब्रॉन्ज सामील आहेत. आतापर्यंत 74 जिंकलेला नेपाळ दुसऱ्या स्थानावर आहे. नेपाळने 30 गोल्ड, 16 सिल्वर आणि 28 बॉन्ज जिंकले.

गुरुवारी भारतीय वेटलिफ्टर्सने दोन गोल्ड जिंकली. झिली दलाबेहराने 45 किलो गटात तर स्नेहा सोरेनने 49 किलो गटात सुवर्ण पदकांची कामगिरी केली. भारताच्या यशामध्ये एथलीट्सचे मोठे योगदान होते. त्यांनी 17 गोल्ड, 7 सिल्वर आणि 4 ब्रॉन्ज जिंकले. तर तायक्वांडोमध्ये भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन चांगले होते. त्यांनी तीन गोल्डसह 6 मेडल जिंकले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post