माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : 19 वर्षांखालील वयोगटाच्या क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. या स्पर्धेसाठी फलंदाज प्रियम गर्गची भारताच्या अंडर-19 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तर ध्रुव चंद जुरेल संघाचा उपकर्णधार असणार आहे. भारतीय संघ 19 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत पाचव्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. याआधी भारतीय संघाने चार वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. 2000, 2008, 2012 आणि 2018मध्ये वर्ल्ड कप विजयाचा मान भारतीय संघानं पटकावला आहे.
भारत ग्रुप एमध्ये जपान, न्यूझीलँड आणि श्रीलंका संघासोबत ठेवण्यात आलं आहे. संपूर्ण विश्वचषकात 16 संघ सहभागी होणार आहेत आणि त्यांना चार गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. मुंबईचा यशस्वी जयस्वालसोबत दिव्यांशु सक्सेना, उत्तराखंडचा शशी रावत आणि हैदराबादचा टिळक वर्मा यांचा भारतीय संघाच्या मुख्य फलंदाजांमध्ये समावेश आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघ :
प्रियम गर्ग (कप्तान), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, ध्रुव चंद जुरेल (उपकर्णधार और विकेटकीपर), शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र (विकेटकीपर), सुशांत मिश्रा आणि विद्याधर पाटील.
Post a Comment