उन्नाव बलात्कार पीडितेचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - उन्नाव सामूहिक बलात्कारपीडितेचा रात्री उशिरा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. पाच जणांनी पीडितेला जिवंत पेटवून दिलं होतं. यात ती ९० टक्के भाजली होती. सफदरजंग रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी पीडितेचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार केल्यानंतर तिची जाळून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, उन्नावमध्येही सामूहिक बलात्कार पीडितेच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळं देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पीडितेला तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ती ९० टक्के भाजली होती. तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं होतं.

पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्यानं तिला लखनऊहून विमानानं तातडीनं दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी तिच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पीडिता ९० ते ९५ टक्के भाजली होती. तिला वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र, तिचा जीव वाचवता आला नाही, अशी माहिती तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. पीडितेनं बुधवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी दिली.
तत्पूर्वी बलात्कार पीडितेचा वैद्यकीय अहवाल जारी करण्यात आला होता. त्यानुसार, पीडितेच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. ती भाजली होती. पीडितेला पेटवून देण्यापूर्वी किंवा नंतर तिच्यावर चाकूने वार करण्यात आले नव्हते, अशी माहिती याआधी उत्तर प्रदेशचे पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) यांनी दिली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post