सरकारकडून दिलासा न मिळाल्यास व्हाेडाफाेन आयडिया बंद हाेणार

माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - व्हाेडाफाेन-आयडियाचा वाढता ताेटा कंपनीला कुलूप लावण्याच्या दिशेने घेऊन जात आहे. कंपनीचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्लांनी शुक्रवारी सांगितले की, मागणी केल्याप्रमाणे केंद्र सरकारककडून दिलासा मिळाला नाही तर कंपनी बंद हाेऊ शकते. दूरसंचार कंपन्यांवरील कर्जाचा बाेजा इतका वाढला आहे की कंपनी चालवणे मुश्कील झाले आहे. या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या परिस्थितीचा अंदाज यावरून लावता येऊ शकताे की, व्हाेडाफोन- आयडियाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला मदत मिळाली नाही तर कंपनी बद हाेऊ शकते असे सांगतात. कंपनी आणखी जास्त पैसे गुंतवू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिटमध्ये बाेलताना ते म्हणाले, जर सरकारकडून दिलासा मिळाला नाही तर नाइलाजाने आम्हाला आमचे दुकान (व्हाेडाफाेन-आयडिया) बंद करावे लागेल. कंपनी आता काेणतीही गुंतवणूक करणार नाही असे संकेतही त्यांनी दिले.

सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देशातील दूरसंचार कंपन्यांच्या अडचणींंमध्ये झाली वाढ...

बिर्लांच्या विधानानंतर कंपनीचा शेअर ५ % घसरला

सरकारकडून दिलासा न मिळाल्यास दुकान बंद करण्याच्या विधानानंतर व्हाेडाफाेन-आयडियाच्या शेअर्समध्ये घसरण झाली. कंपनीचा शेअर एकेकाळी ८ टक्क्यांपर्यंत घसरला हाेता. कामकाज संपताना कंपनीचा शेअर ५.३४ टक्क्यांनी घसरून ६.९२ रुपयांवर बंद झाला.

कंपनी - ग्राहकांची संख्या
जियो - 34.82 काेटी
व्हाेडा आयडिया - 37.5 काेटी
एअरटेल - 32.79 काेटी
१९ ऑक्टाेबरच्या आकडेवारीवर आधारीत

दूरसंचार कंपन्यांवर सरकारचे १.४ लाख काेटी थकीत

सस्पेक्ट्रम शुल्क, परवाना शुल्क आणि एजीआर थकीत रक्कमप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दूरसंचार कंपन्यांना जवळपास १.४ लाख काेटी रुपयाचे सरकारला थकीत रक्कम देणे आहे. यामध्ये एअरटेल या कंपनीला जवळपासे ६२ हजार काेटी रुपये आणि व्हाेडाफाेन-आयडियाला कंपनीला जवळपास ५४ हजार काेटी रुपये देणे आहे. अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन तसेच बीएसएनएल, जिओ आणि सेवा बंद केलेल्या काही अन्य कंपन्यांचाही यामध्ये समावेश आहे. कर्जाचा भार वाढल्याने व्यवसायात अडचणी यत असल्या तरी सरकारने सध्या या दूरसंचार कंपन्यांना दाेन वर्षांचा दिलासा दिला आहे.

व्हाेडाफाेनचे सीईओही म्हणाले, कंपनीचे भवितव्य अंधकारमयसर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देशातील दूरसंचार कंपन्यांच्या अडचणींंमध्ये झाली वाढ...

बिर्लांच्या विधानानंतर कंपनीचा शेअर ५ % घसरला

सरकारकडून दिलासा न मिळाल्यास दुकान बंद करण्याच्या विधानानंतर व्हाेडाफाेन-आयडियाच्या शेअर्समध्ये घसरण झाली. कंपनीचा शेअर एकेकाळी ८ टक्क्यांपर्यंत घसरला हाेता. कामकाज संपताना कंपनीचा शेअर ५.३४ टक्क्यांनी घसरून ६.९२ रुपयांवर बंद झाला.

कंपनी - ग्राहकांची संख्या
जियो - 34.82 काेटी
व्हाेडा आयडिया - 37.5 काेटी
एअरटेल - 32.79 काेटी
१९ ऑक्टाेबरच्या आकडेवारीवर आधारीत

दूरसंचार कंपन्यांवर सरकारचे १.४ लाख काेटी थकीत

सस्पेक्ट्रम शुल्क, परवाना शुल्क आणि एजीआर थकीत रक्कमप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दूरसंचार कंपन्यांना जवळपास १.४ लाख काेटी रुपयाचे सरकारला थकीत रक्कम देणे आहे. यामध्ये एअरटेल या कंपनीला जवळपासे ६२ हजार काेटी रुपये आणि व्हाेडाफाेन-आयडियाला कंपनीला जवळपास ५४ हजार काेटी रुपये देणे आहे. अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन तसेच बीएसएनएल, जिओ आणि सेवा बंद केलेल्या काही अन्य कंपन्यांचाही यामध्ये समावेश आहे. कर्जाचा भार वाढल्याने व्यवसायात अडचणी यत असल्या तरी सरकारने सध्या या दूरसंचार कंपन्यांना दाेन वर्षांचा दिलासा दिला आहे.

व्हाेडाफाेनचे सीईओही म्हणाले, कंपनीचे भवितव्य अंधकारमय

व्हाेडाफाेनचे सीईओ निक रिड काही काळ आधी म्हणाले हाेते की जाेपर्यंत सरकार ऑपरेटरवर जास्त कर आणि शुल्क आकारत राहील ताेपर्यंत त्यांचे भवितव्य अंधकारमय राहील. त्यांचा इशारा सरकारने लावलेल्या परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम वापर शुल्काकडे हाेता. तथापि, नंतर मात्र त्यांनी कंपनी बंद करण्याचा आपला विचार नसल्याचे स्पष्ट केले. व्हाेडाफाेन समूहाने आपल्या विधानामध्ये म्हटले हाेते की, कंपनीला काही खाेट्या आणि तथ्यहीन अफवांची माहिती आहे. त्यामध्ये आम्ही बाजारातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

व्हाेडाफाेन-आयडियाला दुसऱ्या तिमाहीत ५१ हजार काेटी ताेटा

सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्हाेडा व आयडियाला सरकारचे जवळपास ५३ हजार काेटी रुपये चुकते करायचे आहेत. दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) अखेर कंपनीला अंदाजे ५१ हजार काेटी रुपयांचा ताेटा झाला हाेता, जाे दूरसंचार इतिहासात एका तिमाहीत झालेला सर्वात जास्त ताेटा आहे. एअरटेलची आर्थिक स्थिती पण चांगली नाही. दुसऱ्या तिमाहीत तिला जवळपास २३ हजार काेटी रुपयांचा ताेटा झाला. दूरसंचार उद्याेगातील एखाद्या तिमाहीतील आतापर्यंतचा सर्वात जास्त ताेटा असल्याने मानल्या जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post