माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरात मागील अनेक दिवसांपासून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. या खोट्या गुन्ह्याच्या माध्यातून प्रतिष्ठीत लोकांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकाराचा अन्याय यापुढे कोणावरही होणार नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्र राहणे आवश्यक असून अन्याय होत असेल तेथे सर्वात पुढे मी असेन. खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती वाढत असून त्यांना लवकरच उघडे पाडून शहरातून बाहेर काढू, असा इशारा देतानाच खोटे गुन्हे दाखल करणार्यां ची माहिती पोलिसांकडून मागवून घेणार असून अशा लोकांवर कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.
शहरातील व्यापारी राजेंद्र चोपडा यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला असून सदर प्रकरणी सखोल चौकशी करुन चोपडा यांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदन प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांना सोमवारी (दि.9) निवेदन देण्यात आले. यावेळी आ. संग्राम जगताप बोलत होते.
यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, संजय चोपडा, विपूल शेटीया, भगवान फुलसौंदर, प्रा. माणिक विधाते, धनेश बोगावत, विजय गुगळे, बाळासाहेब भंडारी, गिरीश अग्रवाल, नितीन पटवा, प्रमोद डागा, अजित गुगळे, मनिष गुगळे, राजेंद्र चोपडा, बाळासाहेब पवार, सुमित कुलकर्णी, वसंत लोढा, जनक आहूजा, मोहन मानधना, बाबूशेठ बोरा, अतुल भंडारी, अभय श्रीश्रीमाळ, नितीन शेटिया, नवनीत गांधी, किशोर गांधी, संतोष बोरा, संतोष गांधी, शांतीलाल गांधी, पोपटलाल भंडारी, संदीप गांधी, नंदलाल कोठारी, सागर गांधी, राजेंद्र गांधी, किरण शिंगवी, अजित गुगळे, सुशील भळगट, संतोष बोरा, रविंद्र गुजराथी, संजय लोढा, राजु डागा, विजय गुगळे, पवन शिंगवी, ललित गुगळे, अॅड.विजय गुंदेचा, अॅड.महेश तवले, मनोज गुंदेचा, अॅड. किशोर गांधी, अॅड. अमृत मुथ्था, अॅड. प्रसन्ना जोशी, किशोर पितळे, आदेश चंगेडिया, अशोक गांधी, सुमितलाल कोठारी, बाळू धाडीवाल, विकी मुथा, सत्यम गुंदेचा, निलेश चोपडा, सुभाष पोखरणा, अमित गटणे, स्वप्निल शिंदे यांच्यासह उद्योजक, व्यापारी, राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठीत लोक उपस्थित होते.
सदर निवेदनात आ. जगताप यांनी म्हटले आहे की, राजेंद्र चोपडा हे अहमदनगर शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी व उद्योजक आहे. शहरात सामाजिक कार्यात नेहमी ते अग्रेसर असतात. व त्यांचे सामाजिक कामही मोठे आहे. त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करुन त्यांची प्रतिमा समाजात मलीन करण्याचा प्रयत्न तक्रारदाराचा आहे. तक्रारदारांची यापुर्वीची पार्श्वयभूमी तपासली असता सन २०१७ साली याच लोकांनी अनाधिकृतपणे राजेंद्र चोपडा यांच्या क्षेत्रावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सदरच्या घटनेबाबत पोलीस प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती व त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्तात या लोकांना त्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले होते व याबाबत न्यायालयातही सदरचे प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे तक्रारदाराची प्रवृत्ती प्रथमदर्शनी पाहता सदरचा गुन्हा हा खोटा दाखल केल्याचे निदर्शनास येते व याबाबत माहिती घेतली असता तक्रारदार हे कधीही राजेंद्र चोपडा यांच्याकडे कामास नव्हते. त्यामुळे सदरचा गुन्हा खोटा दाखल केल्याचे सिद्ध होते. तसेच अशा प्रकरणात बेकायदेशीरपणे ताबा घेऊन खोटे गुन्हे दाखल होण्याच्या घटना यापुर्वीही अहमदनगर शहराच्या इतर भागातही घडल्या आहे. त्यामुळे आपल्यावर खोटे गुन्हे दाखल होतील या भितीने कित्येक पिडीत नागरिक पोलीस प्रशासनाकडे तक्रार करत नाहीत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होणे अपेक्षित आहे. तरी पोलीस प्रशासनाने या प्रकरणात सखोल चौकशी करुन राजेंद्र चोपडा यांना न्याय द्यावा, अशी मागणी आ. जगताप यांनी केली आहे.
सत्यता तपासल्यानंतरच पुढील कारवाई - पोलीस अधीक्षक सागर पाटील यांची माहिती
अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करू शकत नाही त्यामुळे अशा प्रकरणात गुन्हा दाखल करुन घ्यावाच लागतो. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्यास पोलिसांवरच कारवाई होऊ शकते. सदर गुन्ह्याचा सखोल तपास केला जाईल. कोणालाही लगेच अटक होणार नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर सत्य काय आहे ते पाहून पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वाुसन यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी दिले आहे.
पोलिस प्रशासन व न्यायव्यवस्थेवर विश्वास - राजेंद्र चोपडा
शहरासह जिल्ह्यात अशा प्रकारे व्यापारी, उद्योजकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडलेले आहेत. यापूर्वी माजी महापौर भगवान फुलसौंदर, उद्योजक निर्मल मुथा, सागर गोकुळ गांधी, सीएअजय अशोक गांधी, मन्नू शेठ झंवर, गौतम जवाहर बोरा, प्रेमराज पोखरणा, रसिक कटारिया, आंधळे चौरे असोसिएट, अजित लुंकड, अमित अशोक मुथा, योगेश चंगेडीया, अशोक सोनीमंडलेचा यांच्यासह अनेकांवर असे प्रसंग आलेले आहेत. आपला पोलिस प्रशासन व न्याय व्यवस्थेवर विश्वास असून सखोल तपासाअंती सर्व समोर येईल असे राजेंद्र चोपडा यांनी म्हंटले आहे.
Post a Comment