24 व 25 जानेवारीला ‘अहमदनगर स्वरसंग्राम’ सुगमगीत व समुहगीत राज्यस्तरीय स्पर्धा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – मुलांमधील गायन चळवळ अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी, खुलावी, रुजावी यासाठी कलाकारांना दर्जेदार व्यासपीठ मिळावे या उद्देशाने सहज फौंडेशनच्यावतीने नगरमध्ये गेल्या चार वर्षापासून ‘अहमदनगर स्वरसंग्राम स्वरांची रणभूमी’ या राज्यस्तरीय सुगमगीत गायन आणि देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करत आहे. यावर्षीही या स्पर्धा दि. 24 व 25 जानेवारी 2020 रोजी नगरच्या सावेडी येथील माऊली सभागृहात होणार आहेत. कलेची वैभवशाली वारसा लाभलेल्या महाराष्ट्राला आजपर्यंत ‘अहमदनगर स्वरसंग्राम’ स्पर्धेने अनेक दर्जेदार गायक देले आहेत. तसेच या स्पर्धेमुळे अनेक गायक घडले आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे ८४ हजारांची रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती स्पर्धा प्रमुख जालिंदर शिंदे यांनी दिली.

स्पर्धेबद्दल अधिक माहिती देतांना अध्यक्ष अशोक अकोलकर म्हणाले, ‘अहमदनगर स्वरसंग्राम’ स्पर्धेत सुगमगीत गायन स्पर्धा ही लहान आणि मोठ्या गटात होणार आहे. स्पर्धक भक्तीगीत, भावगीत किंवा नाट्यगीत सादर करु शकतात तर देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धेत शाळा, महावीद्यालये, संगीत विद्यालये सहभागी होऊ शकतात. आजपर्यंत झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांनी विविध वाहिन्यांवर होणाऱ्या रियलिटी शो मध्ये चमकून मोठे यश संपादन केले आहे. यात कु.नंदिनी गायकवाड, योगेश रणमले, स्वराली जाधव, प्रिती पंढरपुरकर, तय्यब शेख, अनाहत देशमुख, सायली टाक या विजेत्यांनी पुढे गायन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला हे स्पर्धेचे मोठे यश असल्याचे सांगताना अभिमान वाटतो.

अनुष्का मोशन पिक्चर्स प्रायोजीत व सहज फौंडेशन आयोजित ‘अहमदनगर स्वरसंग्राम’ या स्पर्धेत राज्यभरातील जास्तीतजास्त स्पर्धकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सागर मेहेत्रे, तुषार देशमुख, सहज फौंडेशनचे सदस्य परिश्रम घेत आहेत. स्पर्धेर्साठी प्रथम नावनोंदणी करणे आवश्यक असून इच्छुक स्पर्धकांनी नावनोंदणी साठी रीषीका एन्टरप्राईज प्रोफेसर कॉलनी चौक, ऑरेंज इव्हेंट्स कालिका प्राईड लालटाकी, साई स्पोर्ट्स वाडियापार्क, ओम झेरॉक्स प्रोफेसर कॉलनी चौक येथे संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी जालिंदर शिंदे ९८२२४७४७२७, सागर मेहेत्रे ९७६३११९७१९ या मोबाईलवर संपर्क साधावा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post