बळीराजा पुन्हा संकटात ; राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस


माय अहमदनगर वेब टीम
नागपूर- नववर्षाच्यी सुरुवात राज्यात अवकाळीने झाली आहे. राज्यातील नागपूर, अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसासह जोरदार गारपीटी झाल्याने शेतकरी परत एकदा संकटात सापडला आहे. पावसासहामुळे जिल्ह्यातील इसपूर, झिपला, बोरी, मेंडकी, चिखली, गोधनी येथे पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच, रात्री 2 वाजता जोरदार गारपीट झाले त्यामुळे मोसंबी, संत्रा, कापसाचे तसेच गहू, चना पिकांचेही नुकसान झाले. विदर्भातील नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात गारपीट तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोलीत मुसळधार पावसाने झोडपले आहे.

नागपूर जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. काटोल तालुक्यात खापा परिसरात पहाटेच्या सुमारास गारपीट झाली. बोरांच्या आकाराच्या या गारपिटीमुळे काही घरांच्या छताचेही नुकसान झाले आहे. या गारपीटीमुळे गहू, चना पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी कडाक्याच्या थंडीने जोर पकडला आहे. यवतमाळ जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने थैमान घातले आहे, काही भागात गारपीटही झाली. आधीस संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर अवकाळीने मीठ चोळण्याचे काम केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post